हर्षल गिब्स ने शेअर केले आलिया भट्ट चे मीम, लिहिले ही मुलगी कोण आहे माहित नाही, लोकांनी घेतली मजा
Herschelle Gibbs Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्स (Herschelle Gibbs)ने सोशल मिडियावर केलेले मजेशीर ट्विट आता खूपच व्हायरल झाले असून चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण त्याने शेअर केलेल्या ट्विटमध्ये हर्षलने आलिया भट्टचे (Alia Bhatt) मीम टाकून मी या मुलीला ओळखत नाही असे म्हटले आहे. इतकच नव्हे तर हे मजेशीर मीम शेअर करुन हर्षल ने आपल्या फॉलोअर्सलाही ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न विचारला. त्याचा हे ट्विट सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत असून लोकांनीही या मिम्सची आणि हर्षल ने विचारलेल्या प्रश्नाची मजा घ्यायला सुरुवात केलीय.

हर्षलचे ट्विट वाचल्यानंतर आलिया भट्टने सुद्धा त्याला उत्तर देताना एक मीम शेअर केला, ज्याचे उत्तर देताना हर्षल असे म्हणाला की, "मला खरच माहित नव्हतं की तू एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. मात्र हे GIF खूपच छान आहे."

हर्षलचे ट्विच पाहिल्यानंतर ट्विटरवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी हर्षलच्या त्या ट्विट ला घेऊन खिल्लीही उडवली आणि म्हटले की ही बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आहे.

आलियाने अजूनपर्यंत तरी हर्षल च्या त्या ट्विटवर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आलिया त्यावर काय उत्तर देईल याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- सुरु झाली कपूर आणि भट्ट कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी? 2020 मधील मुहूर्त, सब्यसाची बनवणार आलियाचा लग्नाचा लहंगा

अशी बातमी आली होती की, आलिया भट्ट सलमान खानसह 'इंशाअल्लाह' या चित्रपटावर काम करत आहे. मात्र काही या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यातील काही मतभेदांमुळे सलमानने या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे.