मुंडकं नसलेला व्यक्ती पाहून नागरिकांची उडाली तारांबळ, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
Headless man caught on camera (Photo Credits: YouTube Grab)

तुम्हाला जर भरलेल्या गर्दीत मुंडकं नसलेला व्यक्ती चालताना दिसला तर तुम्ही काय कराल? अशा पद्धतीचा विचित्र आणि भयानक प्रकार पाहून एखादा व्यक्ती भीतीपोटी पळून तरी जाईल नाहीतर त्याला तेथेच चक्कर येईल हे खरे. तर सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे कळू शकलेले नाही. पण साउथ आशियाई मधील असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून भर गर्दीमध्ये एक व्यक्ती त्याला मुंडकं नसलेल्या स्थितीत चालत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या व्यक्तीला मुंडक नसून तो हातामधून काहीतरी घेऊन जात आहे. पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात थोडे विचित्रच वाटेल.

आपण चित्रपट किंवा एखाद्या पुस्तकात मुंडकं नसलेल्या व्यक्तीचा उल्लेख केलेला पाहतो. तसेच सोशल मीडियात मुंडकं नसलेला व्यक्ती, झॉंबी किंवा भुतांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ हा नेमका कोणत्या ठिकाणचा आहे आणि एवढा विचित्र आहे की तो आपण पाहूच शकत नाही.(जन्म घेतल्यानंतर रडण्याऐवजी रागवलं नवजात बाळ; पहा व्हायरल फोटो)

तसेच व्हिडिओ हा काहीसा एडिट केलेला सुद्धा दिसून येत आहे. त्यामध्ये मुंडकं नसलेला व्यक्तीच्या बाजूने गाड्या जात आहेत. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा तो जात असल्याचे दिसत नाही आहे. पण काहीही असो व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. यापू्र्वी गोवा मध्ये सुद्धा मुंडकं नसलेला व्यक्ती फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.