मुलं जन्माला आलं की, सर्वात अगोदर त्याची किंचाळी ऐकायला येते. असं म्हणतात की, बाळ जन्माला आल्यानंतर ते रडणं गरजेचं असते. त्यामुळे त्याचा आवाज तसेच एकूणचं हालचाली सुरळीत असल्याचा अंदाज येतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका नवजात बाळाचा (Newborn Baby) फोटो व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवलं काय? पण हे बाळ जन्माला आलं तेव्हा रडायचं सोडून डॉक्टरांना रागाने पाहतं (Angry Look) होतं. हे पाहून डॉक्टरांना नवल वाटलं. हे बाळ 13 फेब्रुवारी रोजी ब्राझीलमध्ये जन्मलं.
जन्म घेतल्यानंतर या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून डॉक्टर्सचं नव्हे तर नेटीझन्सही चकीत झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे बाळ ब्राझीलमधील रिओ डी जनेरे येथे जन्मलं. डायने डी येसूस बार्बोसा यांनी 13 फेब्रुवारी रोजी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिची प्रकृती ठिक आहे का? हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी तिला थोपटलं. परंतु, ती मुलगी रडण्याऐवजी डॉक्टरांकडे रागानं पाहू लागली. हे पाहून डॉक्टर चकीत झाले. (हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा 'बाहुबली' भूमिकेतील 'हा' व्हिडिओ पाहिलात का? Watch Video)
या बालिकेचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी तिची नाळ कापली नव्हती. जेव्हा नाळ कापली तेव्हा बालिका रडायला लागली. आपल्या बाळाच्या जन्माचा क्षण टिपण्यासाठी बालिकेच्या आईने खास फोटोग्राफरची नेमणूक केली होती. या बालिकेचा हा रागावलेला फोटो याचं फोटोग्राफरने काढला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.