भारतातील पहिलीवहिली पादण्याची 'What The Fart' ही 22 सप्टेंबर म्हणजेच रविवारी गुजरात (Gujrat) मधील सुरत (Surat) शहरात पार पडली. पादण्याच्या स्पर्धेची घोषणा झाल्यापासूनच सर्वत्र याबाबत हवा होती, दहा वीस नव्हे तर तब्बल 60 जणांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवले होते. पण वास्तवात यातील केवळ 20 जणांनीच स्पर्धेच्या दिवशी उपस्थिती दर्शवली आणि त्यातही केवळ तिघांनाच लाज बाजूला ठेवून आपले सादरीकरण करणे शक्य झाले. त्यामुळे कुठेतरी स्पर्धेचा प्रतिसाद निराशाजनक ठरला असा खेद आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सुरत येथील वेसु परिसरात एका आलिशान हॉल मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठीचे निकष अत्यंत सरळ आणि सोप्पे होते, जो स्पर्धक सर्वात जास्त वेळ आणि सुरेल आवाजात पादून परफॉर्म करेल त्याला बक्षीस मिळणार होते. बक्षीस देखील काही थोडेथोडके नसून पहिल्या क्रमांकासाठी 15,000 रुपये, दुसऱ्यासाठी 10 तर तिसऱ्यासाठी 5 हजार इतके असणार होते. स्पर्धेच्या दिवशी हौशीने 70 जण आणि काही मीडिया चॅनेल्स देखील आले होते, या सर्वांना पाहता स्पर्धकांची हिंमत न झाल्याने त्यांनी एक एक करून माघार घ्यायला सुरुवात केली, तरीही यातील तिघांनी हिंमत दाखवत स्टेजवर पॉल ठेवले पण त्यांचे पादण्याचे नमुने काही कौतुकास्पद नव्हते परिणामी कोणालाही बक्षीस देण्यात आले नाही अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
दरम्यान, प्रसिद्ध गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. येत्या काळात अशा प्रकारची स्पर्धा मुंबईमध्ये घेण्याचा देखेल त्यांचा मनसुबा आहे. मात्र आताचा प्रतिसाद पाहता पुढील वेळेस स्पर्धेच्या ठिकाणी खास खोली बनवण्यात येईल ज्यातून पडताना प्रेक्षक हे स्पर्धकाला पाहू शकणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येईल असे सांगण्यात आले.