नोएडा : वराती दरम्यान नाचताना पूल कोसळला, नवरदेवासह 15 जण नाल्यात
Marriage (Image used for representational purpose only)

लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याचा उत्साह नोएडा (Noida) , होशियारपूर येथील 'यादव' कुटुंबीयांना चांगलाच भोवला आहे. ऑलिव्ह गार्डन हॉल (Olive Garden wedding banquet hall)  येथील पूलावर नवरदेवासह त्याचे कुटुंब वरातीमध्ये नाचताना अचानक पूल कोसळला आणि तब्बल पंधरा जण थेट नाल्यात कोसळले. या दुर्घटनेमध्ये दोन चिमुरड्यांचाही समावेश आहे. नोएडा येथील सेक्टर 52 मध्ये होशियारपूर गावात ही घटना घडली.

अमित यादव आणि सोनमचा शविवारी रात्री विवाह होणार होता. पूलावर नवर्‍याकडील मंडळी नाचत असताना वधूपक्षाकडील मंडळी पूलाच्या दुसर्‍या टोकाला उभे होते. पूलावर नवरदेवासह त्याच्या वरातीमधील मंडळी 10-15 मिनिटं नाचत होती. नाचता नाचता अचानक पूल कोसळला आणि सारे नाल्यात कोसळले. ताबडतोब यंत्रणेची मदत घेत त्यांना नजीकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

वरातीमदरम्यान पूल कोसळल्याचा प्रकार दुर्देवी होता. मात्र मागील 15 वर्षांपासून आम्ही या व्यवसायामध्ये आहोत. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. पण या दुदैवी प्रकारानंतर आम्ही वधूपक्षाकडून बूक करण्यात आलेल्या या हॉलचे सारे पैसे परत केले आहेत. असे हॉटेल मालकाने सांगितले आहे.