Wedding Procession Turns Violent in Budaun:  क्षुल्लक वादातून वराच्या काकाचा संतापाचा कडेलोट, थेट वरातीत घुसवली कार; लहानग्यांसह 11 जखमी
Photo Credit- Pixabay

Wedding Procession Turns Violent in Budaun: उत्तर प्रदेश मधील बदाऊन येथे क्षुल्लक वादातून वराच्या काकांनी वरातीत सहभागी झालेल्यांवर कार चालवल्याची (Groom uncle got angry) घटना घडली. यात ११ जण जखमी (injured) झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेनंतर वराच्या काकांनी पळ काढला. काही उपस्थितांनी त्यांना पकडणयाचा प्रयत्न केला. मात्र, ते पसार झाले. सध्या जखमींवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.(हेही वाचा:Hardeep Singh Nijjar Murder Case: हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणी चौथ्या भारतीयास कॅनडामध्ये अटक)

ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कल्याणसिंह चौकात घडली. लग्नाची मिरवणूक पॉवर हाऊसजवळ पोहोचली असताना, बिसरतगंज येथील रहिवासी नातेवाईक आणि वराचे काका यांच्यात वाद झाला. बाचाबाचीनंतर वराच्या काकांचा संताप झाला आणि त्यांनी कार थेट लग्नाच्या मिरवणुकीत घुसवली. लग्नाच्या मिरवणुकीच्या मध्यभागी गाडी घुसल्याने समोरून आलेले अनेक जण जखमी झाले.

जखमींची नावे

कासगंज जिल्ह्यातील गोहरा येथील राजेश (वय 32), तसचे त्यांची मुलगी कुमकुम (10), सोरोन कोतवाली परिसरातील मानपूर नगरिया गावातील रहिवासी नवीन चंद्र (12), मुलगा दिनेश, सत्य नारायण, सुनील यांचा जखमींमध्ये समावेश आहे. तसेच सिरौली, बरेली येथील पट्टी गावातील रहिवासी कुमार (30), जगपाल (18), बिसौल, नितीन साहू (25), अनमोल (21), उजनी कोतवाली भागातील आधाली, आकाश यादव (20) रा. रामलीला नागला नगर त्याशिवाय, एक महिला यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

सध्या जखमींवर सामुदायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहेत. आकाश यादव याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्याला रात्रीच आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आकाशचे वडीलांनी सांगितल्या प्रमाणे वराचे काका दारूच्या नशेत होते. घटलेल्या घटने प्रकरणी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यांनी सांगितले.