Sanna Marin | | (Photo Credit: Twitter/Facebook)

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन (Finland Prime Minister Sanna Marin ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) कथीतपणे नाचताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असे वाटते आहे की, हा व्हिडिओ (PM Sanna Marin Viral Video) एका पार्टीतला असावा आणि बहुदा ही पार्टी खासगी असावी. या व्हिडिओत त्या आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नाचताना आणि गातानाही दिसत आहेत.

पंतप्रधन मारिन यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, एका पार्टीदरम्यान त्यांनी केवळ मद्यसेवन केले होते. मित्र-मैत्रीनिंसोबत असलेली ती पार्टी खासगी होती. तसेच, आपल्या वर्तनाचे व्हिडिओ चित्रिकरण होत असल्याची आपल्याला कसलीच कल्पना नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, एखाद्याच्या खासगी आयुष्याचे असे चित्रिकरण करुन ते व्हायरल करणे हे वेदनादायी असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. (हेही वाचा, Cocaine Smuggling in Vagina: 24 वर्षीय मॉडेलचा गुप्तांगात लपवलेल्या कंडोममधून ड्रग्जच्या तस्करीचा प्रयत्न; 'अशी' झाली पोलखोल)

ट्विट

दरम्यान, पीएम मारिन पुढे म्हणाल्या की त्या पार्टीत त्या नाचल्या आणि गायल्या. जे पूर्णपणे कायदेशीर आहे. आपण काहीही गैर केले नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या वर्तनात बदल करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

ट्विट

सोशल मीडियावर व्हिडिओ लीक झाल्यानंतर, मारिन यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी तर मरीन यांनी ड्रग्ज घेतले असावे असा संशय व्यक्त करत त्यांची वैद्यकीय तपासणी करावी असे म्हटले आहे.

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान लाभलेल्या 36 वर्षीय मरिन यांचे विविध संगीत महोत्सवात अनेकदा फोटो काढण्यात आले आहेत. गेल्या वर्षी, कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्यानंतर तिने क्लबिंगमध्ये गेल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली होती.