काश्मीर मधील कलम 370 वरून लोकसभेत काँग्रेस खासदार मनीष तेवरी यांचे हास्यास्पद विधान, ट्विटर वर ट्रेंड होऊ लागलं Fifty Shades Of Grey
Congress MP Manish Tewari. (Photo Credit: PTI)

अनेकदा नेते मंडळींच्या भाषणात बेताल वक्तव्यावरून होणारी फजिती आपण ऐकली असेल, असाच काहीसा प्रकार लोकसभेत नुकताच पाहायला मिळाला. जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir)  मधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावरून वाद चालू असताना काँग्रेसचे खासदार मनीष तेवरी (Manish Tewari)  हे काँग्रेसची (Congress)  भूमिका मांडत होते. यावेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी मनीष यांनी चक्क Fifty Shades Of Grey या पुस्तकाचा संदर्भ दिला. कलम 370 हटवण्याप्रकरणी काँग्रेसचे मत तटस्थ आहे असे सांगताना मनीष म्हणले की, एक इंग्रजी पुस्तक आहे ज्यानुसार नेहमीच पांढरं किंवा काळं निवडायची गरज नसते कारण जगात करड्या रंगाच्या 50 छटा आहेत. या विधानानंतर लोकसभेत एकच हशा पिकला, तसेच हा किस्सा ट्विटर वर पोहचल्याने #Fifty Shades Of Grey हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहे.

लोकसभेत कलम 370 वर वाद सुरु असताना खासदार आपापली मते मांडत होती, त्यामध्ये मनीष यांनी सुद्धा आपले भाषण संपवल्यावर गृहगमंत्री अमित शाह यांनी त्यांना काँग्रेसचे नेमकी भूमिका काय आहे असा सवाल केला. ज्यावर मनीष यांनी Fifty Shades Of Grey चा संदर्भ देत आपला पवित्र तटस्थ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न पुरता फसला.

दरम्यान याबाबत ANI या वृत्त संस्थेच्या संपादक स्मृती प्रकाश यांनी ट्विट करून मनीष यांनी केलाय विधानाची माहिती दिली होती तसेच ज्यांना माहित नाही त्यांनी हे पुस्तक काय आहे हे जाणून घ्या अशी सांगितले होते. या ट्विटला उत्तर देत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर देत आपणही लोकसभेत अशी प्रतिक्रिया दिली.

पहा ट्विट

दरम्यान, जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर अनेक नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निर्णयाचे समर्थन केले होते. तर आज यांनी या निर्णयाचा निषेध केला होता.