Fake News on COVID-19 (Photo Credits: PIB)

सोशल मीडिया माध्यमांवर एक मेसेज वेगाने फिरत आहे. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंग (Social Distancing) आणि मास्क घालणे (Use of Masks) आवश्यक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसंच कोविड-19 हा फ्लू व्हायरस असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. हा दिशाभूल करणारा मेसेज सोशल मीडियाच्या ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर व्हायरल होत आहे. कोविड-19 हा बरा होणारा फ्लू असल्याने त्याचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, मास्क घालणे आवश्यक नसल्याचे WHO च्या डॉक्टरांनी म्हटले असल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

तसंच कोविड-19 हा संसर्गजन्य रोग नसून त्यासाठी सोशल डिस्टसिंग, आयसोलेशन आणि क्वारंटाईन प्रोटोकॉल्स पाळणे आवश्यक नसल्याचे WHO कडून सांगण्यात आले आहे. या मेसेजमागील सत्यता उलघडा प्रेस इनफार्मेशन ब्यूरोकडून करण्यात आला आहे. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य रोग असून यावर अद्याप औषध नसल्याने मास्क घालणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे पीआयबीने (PIB) स्पष्ट केले आहे. (Fact Check: MSME मंत्रालय लोन देण्यासाठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी आकारात आहे? PIB ने उलघडले सत्य)

Fact Check By PIB:

कोरोना व्हायरस संकटकाळापासून सोशल मीडियावर फेक न्यूजचे जाळे पसरले जावू लागले आणि सातत्याने ते वाढत आहे. त्यामुळेच फेक आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजेंना बळी न पडण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येते. दरम्यान, फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पीआयबी फॅक्ट चेककडूनही फेक व्हायरल मेसेज मागील सत्याचा उलघडा करण्यात येतो.