Fact Check: 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिस मधून पैसे काढण्यासाठी 25 रुपये शुल्क आकारणार? जाणून घ्या सत्य
Fake Social Media Post (Photo Credits: Twitter/PIB)

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिसद्वारे खातेधारकांना पेसे काढण्यासाठी 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरल बातमीमुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील सत्य तपासले असून हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने (Post Office) अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटोत काही युवक पोस्ट ऑफिसमधून पैसे काढण्यासाटी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. त्यावर लिहिले आहे की, "मोदी सरकारचा अजून एक झटका. पोस्ट ऑफिसमधून पैसे काढण्यासाठी एक एप्रिलपासून 25 रुपये आकारण्यात येणार आहे." (Fact Check: कोरोना व्हायरसच्या लसीसाठी 500 रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमागील सत्यता)

Fact Check By PIB: 

पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत. सरकारच्या या योजनांमध्ये करोडो लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे फेक व्हायरल न्यूजमधील हा दावा अनेक लोकांची दिशाभूल करु शकतो. म्हणूनच पीआयबीने फॅक्ट चेकद्वारे हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामुळे लोकांची फसवणूक किंवा दिशाभूल होऊ नये म्हणून पडताळणी केल्याशिवाय सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येते.