Fish Eating Another Larger Fish-Fact Check: माशाने गिळला मासा, पाहा कसा? जबरदस्त व्हिडिओ, जाणून घ्या वास्तव
Fish Swallowed Another Fish | ( Photo Credits: Twitter)

मोठा मासा छोट्या माशाला खातो ही म्हण मराठीत प्रचलीत आहे. पण या म्हणची प्रचिती घेतलेला व्यक्ती मात्र शक्यतो पाहायला मिळत नाही. असाच एक व्हिडिओ (Fish Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत एक मासा दुसऱ्या माशाला गिळत (Fish Eating Another Larger Fish) असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटर युजर Big Boi द्वारा 28 ऑक्टोबर 2019 मध्ये शेअर केलेला हा व्हिडिओ 2021 मध्ये व्हायरल (Fish Viral Video) झाला आहे.

व्हिडिओत दिसते ते दृष्ट वास्तवात असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. याच्या पुष्ठीसाठी ईल माशाचे (Eel Fish) उदारहरण दिले जात आहे. तसेच, व्हिडिओ दिसणारा मासाही Eel Fish असल्याचे सांगितले जात आहे. युट्यूब युजरस ‘Fisherman Animal Lover’ ने आपल्या चॅनलवर एक मोठा आणि दीर्घ व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतही एक मोठा मासा एका छोट्या माशाला खात असल्याचे दिसते. युजर्सने हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि व्हिडिओत दिसणारे दोन्ही मासे कोणत्या प्रजातीतील आहेत याबाबत उल्लेख केला नाही. (हेही वाचा, King Cobra नागाने गिळली प्लास्टिकची बाटली, काय झाली अवस्था? पाहा व्हिडिओ)

व्हिडिओत दिसते तसे वास्तवात घडत असल्याबाबतची शक्यात खूपच कमी असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच, नरभक्षक मासा पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचेही अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. अनेक माशांच्या प्रजाती छोट्या असतात. मात्र काही प्रजाती मोठ्या असतात. त्यांचे पोटही मोठे असते. ज्यात छोट्या प्रजातीचे मासे आरामात मावू शकतात. सर्वच प्रजातींना हे शक्य होत नाही.

व्हिडिओत आपण पाहू शकता एका माशाने दुसऱ्या माशाला गिळण्याचा प्रयत्न केला आहे. छोट्या माशाच्या शरीराचा एक मोठा हिस्सा गिळण्यात हा मासा यशस्वीही ठरला आहे. परंतू, पुढे त्याला हे शक्य होत नाही. हा मासा दुसरा मासा गिळण्याचा प्रयत्न अनेक वेळा करतो आहे. परंतू यात त्याला यश येत नाही. अखेर तो हा मासा बाहेर फेकून देतो आहे.