King Cobra नागाने गिळली प्लास्टिकची बाटली, काय झाली अवस्था? पाहा व्हिडिओ
Cobra Swallows Plastic Bottle. (Photo Credits: Twitter@parveenkaswan)

King Cobra (किंग कोब्रा) नाग (Nag) हा भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजातीपैकी एक. अशा या विषारी सापाने चक्क प्लास्टिकची बाटलीच गळली. ही बाटली त्याच्या पोटात गेली. प्लॅस्टिकची बाटली (Plastic Bottle) गिळताना आणि ती गिळल्यावर King Cobra नागाची गिळल्यावर नागाची झालेली अस्था दाखवणारा एक व्हिडिओ सोळल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिंगल यूज प्लास्टिक (Single Use Plastic) आणि पर्यावरणात निर्माण होणाऱ्या समस्या हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भारतीय वन अधिकारी (आईएफएस) (Indian Forest Officer) परवीन कस्वां (Parveen Kaswan) यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलित करु शकतो. हा व्हिडिओ पाहून तुम्ही कल्पना करु शकता की देशात सिंगल यूज प्लॅस्टिक किती भयान समस्या निर्माण करत आहे. प्लास्टिकची बाटली गिळल्यावर किंग कोब्राला होणारा त्रासही (Cobra Swallowed a Plastic Bottle) तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. (हेही वाचा, Sex power वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सँड बोआ या सापाविषयी तुम्हाला माहिती आहे का? घ्या जाणून)

वनअधिकारी परवीन कस्वां यांनी म्हटले आहे की, साप गिळलेली वस्तू बाहेर काढू शकतो. परंतू, जे इतर प्राणी आहेत ज्यांना एकदा गिळलेली वस्तू तोंडावाटे बाहेर काढता येत नाही अशा प्राण्यांना किती त्रास होऊ शकतो याची आपण कल्पना करु शकता. अशा प्रकारे प्लास्टिक गिळणे हे अनेक प्राण्यांसाठी धोकादायक ठरु शकते. असे घडल्याने काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. तर काही प्राण्यांना आयुष्यभर त्रास होऊ शकतो.  (हेही वाचा,साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती )

पाहा व्हिडिओ

संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीनुसार जगभरात प्रति मिनीट सुमारे 10 मिलियन इतक्या प्लास्टिक बाटल्या खरेदी केल्या जातात. तर, 5 ट्रिलियन सिंगल यूज प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात. दरम्यान, देशात प्लास्टिकमुळे निर्माण होणारी समस्या काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी देशातील सुमारे 18 राज्यांमध्ये प्लास्टिकवर पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, केरळ यांसारखी अनेक मोठ्या आणि छोट्या राज्यांचा समावेश आहे.