Fact Check: स्थलांतरित कामगार म्हणून ट्रेनच्या बोगीतून एक महिला बाळासह प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, जाणून घ्या सत्यता
सोशल मीडियात खोटा व्हिडिओ व्हायरल (Photo Credits-Twitter)

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश जाहीर केले होते. परंतु लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे कामगार वर्गाने आपल्या घरी जाण्याची वाट पकडली असून मिळेल त्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सरकारने लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या असून त्यांना आपल्या जिल्ह्यात सोडले जात आहे. याच दरम्यान, सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला तिच्या चिमुकल्या बाळासह ट्रेनच्या बोगीतून प्रवास करत असल्याचे दाखवण्यात आले असून ती स्थलांतरित कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सतत्या काही वेगळीच आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्यता अशी आहे की, हा व्हिडिओ भारतामधील नसून बांग्लादेश येथील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 206 पूर्वीचा हा व्हिडिओ असून अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.(Fact Check: मुंबई ते पश्चिम बंगाल धावली गर्दीने खचाखच भरलेली श्रमिक स्पेशल ट्रेन? व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे बांगलादेशचा, जाणून घ्या बातमीमागील सत्य)

दरम्यान, लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आल्यानंतर काही समजाकंटकांकडून सोशल मीडियात अफवा आणि खोटी माहिती पसवली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर स्थलांतरित कामगार आणि मजूरांबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनचा लाभ घेतला आहे. तसेच स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी सुखरुप परतता यावे यासाठी सुद्धा प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.