Car Driver Hanged Cab Driver On Bonnet: देशाची राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मद्यधुंद ड्रायव्हरने (Car Driver) एका व्यक्तीला बोनेट (Bonnet) ला लटकवून दिल्लीच्या रस्त्यांवर तीन किलोमीटर लटकवून नेलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याकडे आश्रम चौकात ही घटना घडली. यावेळी रस्त्याच्या कडेला उपस्थित असलेल्या पीसीआर व्हॅनने या व्यक्तीला गाडीच्या बोनेटला लटकलेले पाहून त्याचा पाठलाग करून कार थांबवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कार आश्रम चौकातून निजामुद्दीन दर्ग्याच्या दिशेने येत होती. चेतन असे पीडित तरुणाचे नाव आहे. चेतनने सांगितले की, मी ड्रायव्हर आहे, मी एका प्रवाशाला सोडून आश्रमाजवळ पोहोचलो तेव्हा एका कारने माझ्या गाडीला तीन वेळा धडक दिली, मग मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत, मग मी त्यांच्या बोनेटला लटकलो, तरीही तो थांबला नाही. (हेही वाचा -Viral Video: गायीच्या वासराची गाडीतून सैर, व्हिडिओ झाला व्हायरल (पहा व्हिडिओ))
त्यांनी मला आश्रम चौकातून निजामुद्दीनपर्यंत ओढत नेल्याचा आरोप चेतनने केला आहे. वाटेत मला एक पीसीआर दिसला आणि त्यांनी आमचा पाठलाग करून गाडी थांबवली. ही व्यक्ती पूर्णपणे नशेत होती, असंही चेतनने सांगितलं आहे.
#WATCH | Delhi: At around 11 pm last night, a car coming from Ashram Chowk to Nizamuddin Dargah drove for around 2-3 kilometres with a person hanging on the bonnet. pic.twitter.com/54dOCqxWTh
— ANI (@ANI) May 1, 2023
माझ्या कारने त्याच्या गाडीला धडक दिली नाही, मी गाडी चालवत होतो, तेव्हा तो मुद्दाम माझ्या गाडीच्या बोनेटवर चढला, असे आरोपी रामचंद कुमारने सांगितले. मी त्याला खाली उतरण्यास सांगितले पण त्याने ऐकले नाही.