हिंमत असेल तर काहीही शक्य! गीरच्या जंगलात कुत्र्याने घेतला सिंहाशी पंगा, (Watch Video)
Lion and dog fight at Gir National Park (Photo Credits: Zee 24 Kalak YouTube)

Viral Video : जंगलाचा राजा सिंह कधी कोणासमोर येऊन उभा ठाकला तर भलेभले भीतीने थरथरायला लागतात, पण गीरच्या जंगलात एक वेगळंच दृश्य अलीकडे पाहायला मिळालं, लहानगा कुत्रा भल्या मोठ्या सिंहाशी पंगा घेत भांडत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या कुत्र्याचं धाडस बघून नेटकऱ्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटं घातलीयेत, तसेच कुत्र्याचं नशीब बलवान होतं म्ह्णून या भयंकर सिंहाशी केलेल्या लढाईत वाचला असंही लोक म्हणत आहेत.

गीरचे राष्ट्रीय उद्यान (Geer National Park) व अभयारण्य (Sanctuary) हे काही आशियाई सिंहांच्या प्रजातींचे (Asian Lions Species)शेवटचे निवासस्थान उरले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागातर्फे पूर्ण काळजी घेण्यात येते. या सुरक्षित परिसरात अनेकदा सिंह थेट रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचे व्हिडीओज देखील यापूर्वीही पाह्यला मिळाले आहेत, मात्र यावेळी समोर आलेला हा कुत्रा आणि सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ आश्चर्यच म्हणायला हवा. मुंबईकरांनो सावधान! राणीच्या बागेत होतंय बिबट्याचे आगमन, जून 2019 पासून घेता येणार भेट

 (Watch Video)

 

या व्हिडीओ मध्ये सिंह जंगलातल्या झाडांपाशी झोपलेला असताना शेजारून एक कुत्रा जात असताना पाहायला मिळत आहे, यामध्ये नेमकी भांडणाची सुरवात कोणी केली हे जरी स्पष्ट होत नसलं तरी थोड्याच वेळात या दोन्ही प्राण्यांमध्ये मारामारी सुरु होते, सिंह आपल्या मोठाल्या पंजानी कुत्र्यावर वार करत असताना इवलासा कुत्राही पळून जाण्याऐवजीची त्याला पलटवार करताना दिसत आहे त्यानांतर काहीच वेळात सिंह खाली पडतो आणि तितक्यात हा कुत्रा पळवून जातो, असा एकंदरीत थरार व्हिडिओ मधून समोर येत आहे.  प्राणी-पक्षांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; मुंबई महापालिकेचा निर्णय

 

या व्हिडीओ बद्दल माहिती देत असताना गीर अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी हा पहिलाच असा प्रसंग असल्याचे सांगितले. यापूर्वी अनेक पर्यटक इथल्या प्राण्यांना त्रास देताना किंवामांस दाखवून चिडवताना पाहायला मिळायचे त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाने आपले नियम अधिकच कठोर केले आहेत.गीरचे अभयारण्य इथल्या झाडांच्या संख्येमुळे प्राण्यांसाठी एक सुरक्षित व अनुकूल निवासस्थान देणार 1500 किमी अंतरावर पसरलेलं राष्ट्रीय उद्यान आहे.