भारतात चीनी ऍप टिकटॉकला (Tik Tok) अधिक पसंती दर्शवली जात आहे. तसेच अनेकांना टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे वेड लागले आहे. केवळ तरूण नव्हेतर, लहान मुले आणि जेष्ठांचा यात समावेश आहे. टिकटॉकच्या माध्यमातून अनेकजण स्वतःतील कलागुणांना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. मात्र, टिकटॉकवर व्हिडिओ तयार करणे, एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. सध्या बुलाती है मगर जानेका नही या संवादाचा ट्रेन्ड सुरू आहे. याच शायरीवर पिंपरी चिचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांचा व्हिडिओ तयार करुन पोलिसांची थट्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.
प्रसिद्ध गजलकार राहत इंदूरी यांच्या बुलाती है मगर जानेका नही या शायरीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या शायरीच्या माध्यमातून अनेकजण व्हिडिओ तयार करून शेअर करत आहेत. परंतु, पुण्यात राहणाऱ्या एका तरूणाने या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ तयार करुन स्वत:वर संकट ओढून घेतले आहे. संबंधित तरूणाने पिंपरी-चिंचवडमधील पोलीस ठाणे किंवा पोलिसांची व्हॅनचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्याला बुलाती है मगर जाने का नही असा संवाद जोडून व्हायरल केले आहे. काही हजार आणि शेकडो लाईकसाठी पोलिसांची थट्टा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा सुरू झाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले असून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव
टिक-टॉकवर व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर अपलोड करण्याची जणू तरुणांमध्ये स्पर्धाच लागली आहे. एवढेच नव्हेतर, लाईक आणि कमेंटसाठी अनेक तरुण वर्ग धोकादायक व्हिडिओ तयार करत असल्याचे समजत आहे. यातच एका तरूणाने आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या रेल्वेमधून टिकटॉक व्हिडिओ महागात पडले होते. यात तो थोडक्यात बचावला होता. या व्हिडिओवर रेल्वे मंत्री पियुष गोयाल यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली होती