टिक-टॉकवर (Tik-Tok Video) थरारक स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर (Social Media) अपलोड करण्याची जणू तरुणांमध्ये स्पर्धाच लागली आहे. नुकतीच दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान लोकलच्या दारात स्टंट करताना 20 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. यातच नवा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला आहे. धावत्या रेल्वेतून धोकादायक व्हिडिओ काढत असताना एक तरुण थोडक्यात बचावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून या स्टंटबाजाच्या मुसक्या आवळण्यासाठी आरपीएफच्या कारवाईसह विशेष मल्टिमीडिया जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्टंटबाजी करणारे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत.

सोशल मीडियावर सध्या स्टंटबाजी करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या टिकटॉक व्हिडिओची क्रेझ आहे. तरुणाईकडून व्हिडिओ बनविण्याचे प्रमाण अधिक आहे. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मात्र, ते बनविताना अनेकजण आपला जीव धोक्यात घालून व्हिडिओ व्हिडिओ तयार करतात. याबाबत कोणताही विचार तरुण वर्ग करताना दिसत नाही. लोकलच्या दारात उभे राहून भरधाव लोकलमधून तसेच रेल्वे ट्रॅकवर उभे राहून रेल्वे जवळून जातानाचे व्हिडिओ बनविल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओत एक तरूण धावत्या रेल्वेसह स्टंटबाजी करणारा एक व्हिडिओ तयार करत आहे. दरम्यान, संबंधित तरूणाचा मित्र त्याच्या व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडिओ काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. सुदैवाने, त्याला मोठी दुखापत झाली नसून त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हे देखील वाचा- डोनाल्ड ट्रम्प, काहीही सांगू नका! फेसबुकवर तुम्ही क्रमांक एक नाही आहात

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, दररोज उपगगरीय लोकलमधून 75 लाखांहून अधिक लोक प्रवास करत आहेत. यात तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र,  जेव्हापासून सोशल मीडिया आला. तेव्हापासून लोकल प्रवासाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होऊ लागले आहे. तसेच लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी तरूण वर्ग आपला जीव धोक्यात घालत आहे.