जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. भारत देशातही कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. कोरोनाचा देशात फैलाव सुरु झाल्यानंतर त्यासंबंधित अनेक फेक न्यूज (Fake News) डोके वर काढू लागल्या. कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत गेला तशा कोरोना संबंधित अफवा (Rumors), खोटी माहिती, बातम्या पसरु लागल्या. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर या फेक न्यूजचा वावर अगदी लिलया होत आहे. त्यात अजून एका बातमची भर पडली आहे. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येकाच्या खात्यात 15000 रुपये डिपॉझिट करणार आहेत. (10 सेकंद श्वास रोखून धरणाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होत नाही? काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य?)
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हायरस मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली आहे. त्यात वैयक्तिक माहिती विचारण्यात आली आहे. नाव, फोन नंबर, पत्ता इत्यादी. या व्हायरल मेसेजमागील सत्यता भारतीय प्रेस ब्युरो ने (Press Information Bureau of India- PIB) तपासली असून ही वार्ता खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खोट्या बातम्या, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे.
मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा- लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत पंतप्रधान मोदी प्रत्येक भारतीयाला मदत म्हणून 15000 रुपये देणार आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुमची माहिती भरा.
तथ्य- असा कोणताही दावा भारत सरकारकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा मेसेज व त्यातील लिंक फेक आहे. त्यामुळे अशा प्रकराच्या खोट्या मेसेजेस पासून दूर रहा, असे पीआयबीने ट्विट द्वारे सांगितले आहे.
PIB Tweet:
दावा : कठिन परिस्तिथियों के बीच, पीएम हर भारतीय को 15 हजार रुपय की मदद दे रहे हैं जिसे प्राप्त करने के लिए दिए गए लिंक पर क्लिक करके फॉर्म भरना होगा।
तथ्य :यह दावा बिलकुल झूठ है,व दिया गया लिंक फर्जी है|
कृप्या अफवाहों और जालसाज़ों से दूर रहें| pic.twitter.com/BrgEJYeUCW
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 14, 2020
कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 12,380 वर पोहचली आहे. तर त्यापैकी 1489 रुग्ण बरे झाले आहेत. तर 414 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.