गुजरात राज्यात मुसळधार पाऊस (Gujarat Rains) कोसळतो आहे. ज्यामुळे वडोदरा येथे पूर (Vadodara Floods) आला आहे. या पुराचा फटका नागरिकांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही बसतो आहे. परिणामी येथील कामनाथ नगरमधील (Kamnath Nagar) नागरी वस्तीमध्ये गुरुवारी एक 15 फूट लांब मगर (Rescue) पाहायला मिळाली. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. या पावसाचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खास करुन विश्वामित्री नदीला पूर (Vishwamitri River Floods) आला आहे. याच पुरातून मगर नागरी वस्तीत आल्याचे सांगितले जात आहे. नागरी वस्तीत अचानक मगर आढळल्याने नागरिक घाबरले. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तत्परतेने प्रतिसाद देत, विभागातील स्वयंसेवक घराच्या प्रवेशद्वाराजवळ मगर विसावत असल्याचे शोधण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
विश्वामित्री नदीत मोठ्या प्रमाणावर मगरी
मगर आक्रमक झाल्याने बचाव कार्य आव्हानात्मक होते. दरम्यान, सुमारे एक तासाच्या काळजीपूर्वक प्रयत्नांनंतर, स्वयंसेवकांनी सरपटणाऱ्या प्राण्याला (मगर) सुरक्षितपणे पकडण्यात आणि त्यांचे स्थलांतर करण्यात यश मिळविले. याच घटनेत बुधवारी रात्री उशिरा सामा परिसरातून 11 फूट लांबीच्या आणखी एका मगरीची सुटका करण्यात आली. ही मगर दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर वडोदरातील काही भागांना वेढलेल्या पुराच्या पाण्यात पोहत असताना दिसली. प्राप्त माहितीनुसार, शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीत अंदाजे 300 मगरी आहेत. नुकत्याच आलेल्या पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे अनेक मगरी शहरी भागात प्रवेश करू शकतात. वनविभागाने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि यापुढे मगरी दिसल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Kolhapur: पंचगंगा नदीत मगरींच्या दहशतीत 5 दिवस चिखलात रूतला होता 19 वर्षीय तरूण; पहा कसा वाचवला जीव?)
मुसळधार पावसामुळे 26 जणांचा मृत्यू
गुजरात राज्यांमध्ये पाठिमागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अद्यापही पाऊस सुरुच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार पावसाने पूरग्रस्त भागातून सुमारे 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मृतांमध्ये मोरबी जिल्ह्यातील हलवड तालुक्यातील धवना गावाजवळ रविवारी भरून वाहत असलेला कॉजवे ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. (हेही वाचा, Crocodile Attacks Video: मगरीचा हल्ला, जबड्यातून थोडक्यात बचावला कर्मचारी; प्राणीसंग्रहालयातील घटना, व्हिडिओ व्हायरल.)
वन विभागाने मगरीस पकडले
#Gujarat rains: 15-feet long crocodile ventures into #Vadodara locality
Residents of Kamnath Nagar near Fatehgunj area in Vadodara woke up to a 'huge' surprise after a crocodile waded through the flood waters and reached a house in the colony
Knoe more 🔗 https://t.co/AR22pll4GU pic.twitter.com/qGrTJcR3CX
— The Times Of India (@timesofindia) August 29, 2024
वडोदरा, पावसाच्या विरामानंतरही, विश्वामित्री नदीने किनारी मोडल्याने, निवासी क्षेत्रे, रस्ते आणि वाहने पाण्याखाली गेल्याने सखल भागात तीव्र पुराचा सामना करावा लागला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) आणि अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी लष्कराच्या तीन तुकड्या तैनात करून बचाव कार्य सुरु आहे. एकट्या वडोदरामधून 5,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, अतिरिक्त बचाव पथके आणि उपकरणे बाधित भागात तैनात करण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या बचाव आणि मदत प्रयत्नांमध्ये केवळ एनडीआरएफ आणि एसडीआरएफच नाही तर लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दल यांचाही सहभाग आहे.