Kolhapur: पंचगंगा नदीत मगरींच्या दहशतीत 5 दिवस चिखलात रूतला होता 19 वर्षीय तरूण; पहा कसा वाचवला जीव?
Crocodile | Representational image (Photo Credits: pxhere)

कोल्हापूर (Kolhapur)  मध्ये 19 वर्षीय आदित्य बंदगर ची मगरीच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर काढलं आहे. हा थरारक प्रकार 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' उक्तीची प्रचिती देणारा  आहे. ही पंचगंगा नदी (Panchganga River)  मधील घटना आहे. आदित्य 5 दिवस शिरढोण (Shirdhon) गावात शिरोळ (Shirol)  मध्ये एका ठिकाणी तो अडकला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आदित्य घरातील भांडणानंतर तेथून बाहेर पडला. त्याची स्लीपर नदीच्या काठावर सापडली म्हणून आसपासचा भाग तपासण्यात आला.  त्याचा शोध न लागल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. कुरूंदवाड पोलिस स्टेशन कडे ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

गावातील मंडळींनी मुलाचा शोध बोटीच्या मदतीने सुरू केला. स्थानिक डिझास्टर रेस्क्यू संस्थांचीही मदत घेतली. ड्रोनचा वापर करूनही, मोठ्या मगरींचा तपास करूनही नदीत 10 किमीच्या भागात तो दिसला नाही. एक टीम परतत असताना त्यांना मदतीसाठी हाक ऐकू आली. त्यावेळी आदित्य सुमारे 10 फीट चिखलात रूतलेला दिसला. आदित्यला चिखलातून खेचून काढण्यासाठी आर्मी रेस्क्यू टीमने रोप वापरला. नक्की वाचा: Crocodile Attacks Video: मगरीचा हल्ला, जबड्यातून थोडक्यात बचावला कर्मचारी; प्राणीसंग्रहालयातील घटना, व्हिडिओ व्हायरल .

दरम्यान अथक प्रयत्नांनंतर आदित्यला बाहेर काढण्यात आले. त्याच्या पायाला यामध्ये फ्रॅक्चर इन्ज्युरी आहे. चिखलातून बाहेर काढेपर्यंत तो बेशुद्धावस्थेमध्ये गेला होता. त्याला चिखलातून बाहेर काढल्यानंतर पुढील उपचारांसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.