Rolling Swarms | (Photo Credit - Twitter)

Rolling Swarm Viral Video: निसर्ग म्हणजे नानावीध रंग रुप आणि जीवांचा नजारा. निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशी पाहताच लक्ष वेधून घेणारी. मग ते आकाशातील रंग असत अथवा पृथ्वीवरील प्राणी, पक्षी आणि जीव असोत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत याचीच तर प्रचिती येते. व्हिडिओत पाहायला मिळते की काही सुरवंट एकत्र आले आहेत. ज्यांना रोलींग स्वार्म (Rolling Swarm) म्हणूनही ओळखले जाते. या एकत्र आलेल्या सुरुवंटांनी एकमेकांना अशा पद्धतीने घट्ट पकडून रस्ता ओलांडला आहे की, जणून एखाद्या सैनिकांची पलटणच निघाली आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओ पाहिल्यावर कोणालाही 'एकीचे बळ मिळते फळ' ही म्हण किंवा गोष्ट आठवू शकते. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत जोडलेल्या प्रतिक्रियेत ट्विटरवर गोयंका म्हणतात की, हा व्हिडिओ म्हणजे जणू एकतेची शक्तीच दर्शवतो. हर्ष गोयंका हे आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, हे सुरुवंट एकमेकांच्या अंगावर चढत आहेत. त्यांनी एकमेकांच्या अंगावर चढूनच रस्ता पार केला आहे. (हेही वाचा, मृत्यूच्या दारात संपलं वैर, बुडत्या मांजराला बिबट्याचा आधार; नाशिक येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

दरम्यान, हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, एकीचे बळ मिळते फळ या म्हणीची आठवण आली. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मानव प्राण्यानेही या सुरवंटांचा हा गुण घ्यावा.

व्हिडिओ

आणखी एका यूजर्सने सुरवंटांचे कौतुक करत म्हटले आहे की, मला व्हिडिओ पाहून हे देखील शिकायला मिळाले आहे की, एकत्र राहून सुरवंट आपल्या भक्षकांपासून देखील स्वत:चा बचाव करतात. कारण एकत्र आल्याने ते ते मोठे दिसतात. त्यामुळे शिकार करणाऱ्या भक्षकांकडून त्यांच्यावर हल्ला होत नाही. परिणामी एकत्र आल्याने त्यांच्यावर हल्ला होत नाही. त्यांचा प्राम वाचतो. हेच तर आहे एकत्र येण्याची ताकद.