Leopard And Cat Viral Video: शत्रू कितीही कट्टर असला तरी मरणाच्या दारात वैर संपतं असं म्हणतात. याचेच प्रत्यंतर नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar Taluka) तालुक्यात असलेल्या टेंभूरवाडी येथे पाहायला मिळाले. रानात भटकत असताना एक मांजर (Cat) बिबट्याच्या नजरेस पडले. आयतीच शिकार मिळाली या हेतूने बिबट्या (Leopard) खूश झाला. मांजराच्या पाठी धावला. पाटलाग करणाऱ्या बिबट्याला चुकविण्याच्या नादात मांजर पडलं विहीरीत. शिकार मिळविण्याच्या ध्येयाने बेभान झालेला बिबट्याला काही कळायच्या आत बिबट्याही मांजरापाठोपाठ विहीरीत पडला. इथूनच सुरु झाला दोघांच्याही जीवनमरणाचा नवा अंक. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.
बिबट्या काय आणि मांजर काय दोघेही एकाच कुळातील. केवळ ताकतीचा फरक. अन्यथा गुण दोघांचेही सारखेच. दोघेही आक्रमक वृत्तीचे आणि पट्टीचे पोहणारे. विहीरीच्या पाण्यात पडूनही बिबट्याने मांजराचा पाटलाग सुरु ठेवला. पण दोघांचाही पाठशिवणीचा खेळ. दोघांना मृत्यूच्या दारात घेऊन गेला. पाण्यात पोहून दोघेही दमले. अखेर बिबट्याला विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार सापडला. ज्यावर तो विसावला खरा. पण दमला होता. लगेच मांजरानेही मग या बिबट्यामध्ये आधार शोधला. मांजर लगेच जाऊन त्या बीबच्याच्या पाठीवर बसले. बिबट्या काहीसा चिडला. पण, करतो काय.. दोघांचीही जगण्याची लढाई सुरु होती. जगण्याच्या लढाईत दोघे वैर विसरले. एकमेकांच्या मदतीला आले. (हेही वाचा, Viral Video: मगरीच्या तावडीतून बचावलेल्या हरणाची बिबट्याकडून शिकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
ट्विट
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे. #Nashik #Sinner pic.twitter.com/pUUC6RCbn6
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) February 14, 2023
दरम्यान, बिबट्या पाण्यात पडल्याची माहिती गावकरी आणि वन विभागाला कळली. वनविभागाचे अधिकारी आणि गावकरी मोठ्या तयारीने विहिरीजवळ आले आणि त्यांनी बिबट्या आणि मांजर अशा दोघांनाही सुखरुप बाहेर काढले. बचावकार्य सुरु असताना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पाठिमागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. प्रामुख्याने तालुक्यातील टेंभुरवा गाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाचे प्रकार वाढले असल्याचे गावकरी सांगतात.