आजकाल लहान मुलांना खेळण्यासाठी पाठवताना सावधान रहा ! पालकांचं दुर्लक्ष आणि मुलांचा नाठाळपणा जीवावर बेतू अशा आशयाच्या मेसेजमध्ये एक व्हिडिओ सध्या सोशलमीडीयावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेला एक व्हिडिओ म्हणजे मुलगा चालत्या गाडीसमोर येऊनही कसा जीवंत राहतो ?
व्हायरल व्हिडिओ
एका इमारतीच्या आवरात मुलं खेळत असतात. एक मुलगा खाली वाकतो. समोरून महिला चालक तिची गाडी सुरू करते आणि कदाचित तिला तो खाली वाकलेला मुलगा न दिसल्याने ती सरळ गाडी पुढे घेते. मुलाच्या अंगावर येणारी गाडी पाहून तुमचा क्षणभर काळजाचा ठोका चुकला असेल मात्र पुढचा प्रकार थक्क करणारा आहे. गाडी अंगावर येऊनही मुलगा सुखरूप राहतो.
गाडीच्या खालच्या बाजूला मुलगा पडून राहिल्याने त्याच्या अंगावरून गाडी गेली तरीही तो सुखरूप बचावला. सध्या सोशल मीडीयामध्ये हा प्रकार चांगलाच व्हायरल होत आहे. याप्रकारानंतर सावधानपूर्वक गाडी चालवण्याचा सल्ला दिला जात आहे सोबतच मुलांना सुरक्षित ठिकाणी खेळायला पाठवा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.