नव्या कारचा अपघात (Photo Credits-Youtube)

एखादी नवी कोरी गाडी खरेदी करणे म्हणजे परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखाच असतो. लोक एक-एक पैसा जोडून गाडी खरेदी करण्याचे स्वप्न उराशी बाळगतात आणि ते पूर्ण सुद्धा करतात. नवीन गाडी घेतल्यानंतर तिच्या समोर नारळ फोडून पूजा करण्यात येते. त्यानंतर ती चालवण्यासाठी सर्वसामान्यपणे काढली जाते. नवी गाडी घेण्याचा आनंद लक्षात राहण्यासारखा असतोच. पण जर त्याचा अतिउत्साह केल्यास तुमचेच नुकसान होण्याची शक्यता असते. अशाच पद्धतीची एक घटना समोर आली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने फोक्सवॅगन पोलो कार खरेदी केली. ही गाडी खरेदी केल्यानंतर मालकाला एवढा आनंद झाला होता की त्याचा गाडीवरील ताबाच सुटला. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर ब्रँन्ड न्यू गाडी शोरुमच्या गेटवरच त्याचा अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, शोरुमच्या बाहेर गाडी गेल्यानंतर त्याचा अपघात झाला. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणच्या आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र दक्षिण भारतातील कोणत्यातरी ठिकाणच्या असल्याचे वाटत आहे.(Coronavirus: या पठ्ठ्याचा Viral Video पाहून अनेकांचा कॉन्फिडन्स पातळ, म्हणे 'मी असताना तुम्ही घाबरु नका, नसताना घाबारा')

कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश शोरुम बंद ठेवण्यात आले होते. जे नुकतेच सुरु करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. शोरुम सुरु झाल्यानंतर एका परिवाराने नवी कोरी फोक्सवॅगन कार खरेदी केली. मात्र खरेदी केल्याच्या काही मिनिटातच कारचा अपघात झाला. सीसीटीव्ही मध्ये एक पांढऱ्या रंगाच्या नव्या कारची चावी मालकाकडे सोपवण्यात आली. परिवाराने गाडीची पूजा सुद्धा केली. मात्र जसे मालकाने कारमध्ये एन्ट्री केल्यानंतर ती सुरु केली. तसे मालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शोरुमच्या बाहेर गाडीचा अपघात झाला.

गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडी मालकाच्या मदतीसाठी स्टाफ मदतीसाठी पुढे आल्याचे दिसून आले आहे. परंतु या दुर्घटनेत मालक जखमी झाला आहे की नाही हे सुद्धा सांगण्यात आलेले नाही. अशाच पद्धतीची एक घटना गेल्या वर्षात सुद्धा समोर आली होती. त्यावेळी एक महिला ह्युंदाई शोरुमच्या आतमध्ये गाडी चालवत होती आणि चुकून ग्लास पॅन मधून बाहेर पडली होती. गाडी शोरुमधून बाहेर गेल्यानंतर तेथील अन्य गाड्यांचे सुद्धा नुकसान झाल्याचे दिसून आले होते.