कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो. कोरोनाचे लोकल ते ग्लोबल चित्र पाहता परिस्थितीही तशीच आहे. अशा काळात कोरोना व्हायरस उपचार, प्रतिबंध आणि काळजी याबाबत अनेक अधिकृत-अनधिकृत दावे झाले. त्यातील काही वास्तवाला धरुन तर काही वास्तवाच्या आजुबाजूलाही फिरकणारे नाहीत. कोरोनाबद्दल दावा करणाऱ्या अथवा माहिती देणाऱ्या एका पठ्ठ्याचा एक व्हिडिओ असाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पठ्ठ्याचा Viral Video पाहून अनेकांचा कॉन्फिडन्स पातळ व्हायची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे व्हिडिओत हा व्यक्ती जे काही बोलतोय ते फारच मनोरंजक आहे. त्यात तो हे ज्या आत्मविश्वासाने सांगतो आहे ते त्याहून मनोरंजक आहे.

व्हिडिओत हा व्यक्ती कोरोना बद्दल आणि लॉकडाऊन काळात स्थलांरित होऊन गावी आलेल्या लोकांबद्दल सांगताना दिसतो. यात तो जे मराठी भाषेत बलतो आहे त्याचा संदर्भ कसातरी लागतो. तो काय म्हणतोय हे थोडेफार तरी कळतंय. परंतू, मराठीला तो त्याच्या खास भाषेची जी काही फोडणी देतो आहे, त्यातले समोरच्याला काहीच कळत नाही. त्यात महत्त्वाचे असे की तो कोणत्या एखाद्या दुसऱ्या भाषेत बोलतो आहे की, असेच काही फेकतो आहे हेही कळत नाही. राहुल खिचडी (Rahul Khichadi) या ट्विटर युजर्सने @rahulkhichadi या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ट्विट

व्हिडिओमध्ये हा पठ्ठा सांगतो आहे की, कोरोनाला अजिबात घाबरायचंच नाही. मी असताना तुम्ही घाबरु नका... मी नसताना घाबरा. मुंबई-पुण्याहून आलेल्या लोकांची मी व्यवस्था केली आहे. कोरोनाबाबत मी शोध करत आहे. मुंबई पुण्याच्या लोकांना मी शेतामध्ये ठेवलेले आहे. त्याची काळजी मी घेतली नाही. घाबरायचंच नाही. मी आहे. तो सगळा शोध मी करतो आहे, असा हा व्यक्ती व्हिडिओत सांगताना दिसतो.