Man pulls train with bike (फोटो सौजन्य - x/@Danishk77853628)

Train Pulling Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) मधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या दुचाकीसह ट्रेन ओढण्याचा (Train Pulling With Bike) प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळण्यासाठी बनवण्यात आला होता. मात्र तो व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली. या व्हिडीओमध्ये तरुणाने आपली दुचाकी केबलच्या साहाय्याने रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या इंजिनला बांधून ट्रेन ओढण्याचा प्रयत्न केला आहे. अशा धोकादायक स्टंटमुळे केवळ तरुणाचाचं नव्हे तर रेल्वे मालमत्तेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील देवबंद ते रुरकी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. रेल्वे रुळावर उभे असलेले रिकामे इंजिन दुचाकीसह ओढण्याचा तरुणाने अयशस्वी प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुझफ्फरनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाला अटक केली. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने (आरपीएफ) सांगितले की, देवबंदमधील माझोला येथे राहणारा 20 वर्षीय आरोपी विपिन कुमार याने सोशल मीडियावर 'पंकज' नावाचा इन्स्टाग्राम आयडी बनवला होता. व्हिडिओमध्ये दिसणारी दुचाकी आणि मोबाईलही तरुणांकडून जप्त करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Reel Goes Wrong: रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली (Watch Video))

या घटनेवर एक निवेदन जारी करत रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, व्हिडिओ जुना असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्तेशी होणाऱ्या अशा छेडछाडीची गंभीर दखल घेतली जात असून अशा कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मुझफ्फरनगर बाईक ट्रेन स्टंट - 

दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्धीचे क्षण मिळवण्यासाठी केलेले असे धोकादायक स्टंट कधी कधी जीवघेणे ठरतात. अशा घटनांमुळे केवळ वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तर सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होते. भविष्यात कोणीही असे स्टंटबाजी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा, यासाठी पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने अशा कृत्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.