Reel Goes Wrong: हरिद्वारमध्ये, एका व्हायरल व्हिडीओमध्ये ( Reel Video)एक तरुणी विष्णू घाट येथे लाकडावर चालत असतानाचे रिल बनवताना गंगा नदीत (Ganga River)पडल्याचे दिसत आहे. मात्र, त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहात तरुणी सुरक्षितपणे बाहेर निघाल्याचे दिसत आहे. 11 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ व्हायरल झाला. तरुणी सुरक्षा म्हणून ठेवण्यात आलेल्या लाकडावर चालत होती. त्यावेळी ती गंगा नदीत पडली. त्यानंतररी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. यात तिला स्वतःला वाचवण्यात यश आलं आहे. तरूणी पोहत सुरक्षित ठिकाणी पोहचली. व्हिडीओत एक माणूस तिच्या मदतीसाठी धावताना दिसला. पण सुदैवाने, तरूणी बचावली.
रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली
भगवान भोलेनाथ बहुत भोले हैं....तत्काल मनोकामना पूरी करते हैं....लड़की रील बना रही थी....पता चला कि तेज बहाव में बह गई...मिली नही... वीडियो हरिद्वार की है pic.twitter.com/XLJGF19RMq
— Gagandeep Singh (@GagandeepNews) September 11, 2024