BJP MP Janardan Singh Sigriwal | ( Photo Credits: Twiiter)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल (Janardan Singh Sigriwal) आणि त्यांच्या समर्थकांना बिहारमधील पूरग्रस्तांच्या संतापाचा चांगलाच सामना करावा लागला आहे. खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या एका शिबिराची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा पूरग्रस्त संतप्त नागरिकांनी सिग्रीवाल यांच्या कार्यकर्त्यांना बदडले. तर, खासदार सिग्रीवाल थोडक्यात बचावल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या अर्चना दालमिया (Archana Dalmia) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. पूरग्रस्तांसाठी बनविण्यात आलेल्या शिबिरात काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पाहणी करण्यसाठी खासदार महोदय त्या ठिकाणी गेले होते.

आगामी विधानसभा निवडणूक 2020 च्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग चढताना दिसत आहे. मग ते सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा बिहारमध्ये आलेला महापूर. बिहारमध्ये आलेल्या महापूराचा फटका बसल्याने सर्वासामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त झालेल्या लाखो लोकांना सरकारकडून मदत आणि बचाव कार्य पोहोचवले जात आहे. काही नागरिकांची सोय निवारा शिबिरांमध्ये केली जात आहे. मात्र, अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्यान नागरिक संतप्त झाले आहेत.

काँग्रेस नेत्या अर्चना दालमिया यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ सोबत सरकार वर टीका करत दावा केला आहे की, 'जनता त्रस्त आहे. हे बिहारमधील पूरग्रस्त नागरिक आहेत. नितीश कुमार, निवडणूक आली आहे. कोणत्या कामाच्या नावाखाली मतं मागाल? इथे जो लोकांकडून मार खात आहेत ते बिहारमधील महराजगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल आणि त्यांचे समर्थक आहेत. आणि जे मारत आहेत ते पूरग्रस्त लोक आहेत.' दालमिया यांनी आपली पोस्ट नितीश कुमार यांनाही टॅग केली आहे. तसेच #BiharFloods #biharelection2020 हे हॅशटॅगही वापरले आहेत. (हेही वाचा, मुंबई: ट्रॅफिक मध्ये नवरा बायकोचा ड्रामा; पतीला कार मध्ये दुसऱ्या गर्लफ्रेंड सोबत बघून गाडीवर चढली पत्नी (Watch Video))

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महाराजगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल हे आपल्या समर्थकांसोबत लकडी येथील पडौली पंचायत भवन परिसरात पोहोचले होते. इथे पूरग्रस्तांसाठी एक शिबीर उभारण्यात आले आहे. या शिबिरांमून काही तक्रारी आल्या होत्या. या वेळी पूरग्रस्त आणि खासदार यांच्यात काही वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. या वेळी पूरग्रस्तांनी सिग्रीवाल यांच्या कार्यकर्त्यांना बदडल्याचे समजते. ही घटना शनिवारी (8 ऑगस्ट) रोजी घडल्याचे समजते. मात्र, काँग्रेस नेत्या अर्चना दालमिया यांनी हा व्हिडिओ 10 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर केला आहे.