मुंबई: ट्रॅफिक मध्ये नवरा बायकोचा ड्रामा; पतीला कार मध्ये दुसऱ्या गर्लफ्रेंड सोबत बघून गाडीवर चढली पत्नी (Watch Video)
Mumbai Couple Fights Viral Video (Photo Credits: Twitter)

असं म्हणतात, नवरा बायकोचं भांडण घराच्या चार भिंतीत झालं तर लगेच सुटतं पण अनेकदा ही भांडणं चव्हाट्यावर आली की त्यांची चर्चा होते. असंच एका जोडप्याचं भांडण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साऊथ मुंबई (South Mumbai)  तील पेडर रोड (Pedder Road) येथील हा व्हिडीओ आहे. स्वतःच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत बघितल्यानंतर या महिलेने रस्त्यावर गोंधळ घालायला सुरूवात केली. इतकंच काय तर पतीच्या रेंज रोव्हर (Range Rover) गाडीवर चढून महिलेने जोरजोरात भांडायला सुरुवात केली.हा गोंधळ सुरु असताना पोलिसांनी सुद्धा मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला पण तरीही बराच वेळ हा सगळा ड्रामा सुरु राहिला. मद्यधुंद पोलिसाने आपल्या गाडीने महिलेला दोन वेळा चिरडले? पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण (Watch Video)

ट्राफिक पोलिसांच्या माहितीनुसार, पेडर रोड वर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारमधून एका महिलेसोबत जात होता. त्यांच्याच मागे एका पांढऱ्या कारमधून त्याची पत्नी पाठलाग करत होती. एकीकडे येऊन दोन्ही गाड्या थांबतात आणि पत्नी पतीच्या रेंज रोव्हर समोर येऊन उभी राहते, त्याला बाहेर यायला सांगते पण तो दरवाजा उघडत नसल्याने ती गाडीवर चढून स्वतःच्या चप्पलेने काचेवर मारायला लागते. जेव्हा पती बाहेर येतो तेव्हा त्याला लाथा मारायला लागते. यावेळी पत्नी आपल्या पतीला आपल्या पांढऱ्या कार मध्ये नेऊन बसवते आणि काळ्या गाडीत असणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडवर हल्लाबोल करते. यावेळी पोलीस मध्यस्थी करून दुसऱ्या महिलेची सुटका करतात. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पहा पती पत्नीचे भर रस्त्यात झालेलं भांडण

दरम्यान, पोलिसांनी या दाम्पत्याला गावदेवी पोलीस ठाण्यात नेले होते मात्र त्यांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही. भर रस्त्यात ट्राफिक केल्याबाबत पोलिसांनी या महिलेला दंड आकाराला आणि सोडून दिले.