मद्यधुंद पोलिसाने आपल्या गाडीने महिलेला दोन वेळा चिरडले? पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण (Watch Video)
Delhi Accident Video (Photo Credits: ANI)

राजधानी दिल्ली (Delhi)  मध्ये सब इन्स्पेकटर पदावरील एका व्यक्तीने अलीकडेच नशेच्या अवस्थेत असताना एका महिलेच्या अंगावर गाडी चढवली आणि दोन वेळा तिला गाडीखाली चिरडल्याचा (Accident) धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावर आता दिल्ली पोलिसांनी या घटनेप्रकरणी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा चिला गावातील घटनेत समावेश नव्हता. भानू नावाचा एक व्यक्ती गाडी चालवत होता. तर गुरुवारी गाझीपूर येथे घडलेल्या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश होता. ज्यामध्ये गाडीने महिलेने गाडी समोर उडी मारली होती.

घटनेचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा एक व्हिडीओ सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार चिल्ला (Chilla)  गावाजवळ झाला. शुक्रवारी, (3  जुलै) रोजी  एक महिला या परिसरातून जात असताना मागून येणाऱ्या एका भर धाव गाडीने तिला टक्कर दिली. यावेळी महिला गंभीर जखमी झाली. अशावेळी तिला मदत करण्याच्या किंवा तिथून निदान पळून जाण्यापेक्षा या गाडीच्या चालकाने या महिलेच्या अंगावर पुन्हा एकदा गाडी चढवली. संबंधित सब इन्स्पेक्टरला पोलिसांनी अटक करून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. Lockdown मध्ये दारू मिळत नाही म्हणून प्यायला सॅनिटायझर आणि कफ सिरप; मद्यपी तरुणाचा मृत्यू

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडिया वर पाहायला मिळत आहे, यात तुम्ही स्पष्ट पाहू शकता की कशाप्रकारे सुरुवातीला ही कार महिलेला येऊन धडकते, महिला कशी जमिनीवर पडते आणि त्याच वेळी काही सेकेंदाने वाहन चालक पुन्हा गाडी महिलेच्या अंगावर चढवत आहे.

ANI ट्विट

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घटनेवेळी आजूबाजुला माणसं सुद्धा उपस्थित आहेत मात्र यातील कोणीच काहीही केले नाही अखेरीस पोलिसांनी जेव्हा येऊन या वाहन चालकाला अटक केली तेव्हा त्या जखमी महिलेला इतरांनी जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी नेले .दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सब-इंस्पेक्टर चे नाव योगेंद्र असे असून ते ५६ वर्षाचे आहेत दिल्ली पोलिसांच्या पीसीआर युनिट मध्ये कार्यरत आहेत घटनेच्या वेळी ते पूर्णतः नशेत होते. त्यांच्यावर कलम 279, 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.