ACCIDENT VIRAL VIDEO pc Twitter

Accident Video: सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे झोप उडवणारे असतात. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा आपल्याला सांगितले जाते की, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरा, प्रवास सुरक्षित होता. मात्र, याची टाळाटाळ करत अनेकदा तरुण मंडळी विनाहेल्मेट प्रवास करत असतात. हेच हेल्मेट प्रवाशांचा जीव वाचवू शकतो याचा उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- झारखंडमध्ये बर्ड फ्लू उद्रेक, चिकन विक्रीवर बंदी)

व्हिडिओ दिसल्याप्रमाणे, एका दुचाकीस्वाराला कार चालकाने चिरलडे आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याने त्याला कुठेही दुखापत झाली नाही. ही घटना कोणत्या राज्यात घडली आहे हे अद्याप समोर आले नाही. कार चालकाने काही सेंकदात कार थांबली. भीषण अपघात होता होता तरुण वाचला.  व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranchi JH777 (@ranchi_jh777)

घटनेनंतर अपघातस्थळी लोकांची गर्दी जमली. तरुणाला डोकं कारच्या चाकात आले होते. त्याला वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतले.  कार आणि बाईकची जोरात धडक झाली आणि त्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. जमिनीवर पडल्यामुळे दुचाकीस्वार थेट कारच्या खाली आला. आणि कार चालकाने न थांबवता कार चालवली. दुचाकीस्वार सुखरुप असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हेल्मेटमुळे जीव वाचल्याचे प्रतिक्रिया दिली आहे.