Map of India shared with false claim (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकटाचा वाढता धोका टाळण्यासाठी भारत देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र या काळात सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज, खोटी माहिती यांचे जाळे पसरायला लागले आहे. त्यात अजून एका फेक न्यूजची भर पडली आहे. अलिकडेच सोशल मीडियावर भारताचा नकाशा मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. त्याद्वारे भारताच्या राज्यातील लोकसंख्येची तुलना इतर देशांची करण्यात येत आहे. उदा. उत्तर प्रदेश-ब्राझील, महाराष्ट्र-मॅक्सिको, गुजरात-साऊथ आफ्रीका, राजस्थान-युएस, इत्यादी. हा नकाशा अमेरिकन सीईओने तयार केला असल्याच्या दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेज मध्ये करण्यात आला आहे. भारत कोरोनाची गंभीर परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवत आहे, हे इतर देशांना दाखवण्यासाठी या खास नकाशाची निर्मिती केली असल्याचे बोलले जात आहे.

या पोस्टमध्ये सीईओचे किंवा कोणत्याही कंपनीचे नाव देण्यात आलेले नाही. हा व्हायरल मेसेज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी देखील शेअर केला आहे. (Coronavirus Lockdown काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15000 रुपये जमा करणार? PIB ने सांगितले व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य)

पहा पोस्ट:

भारताचा हा मॅप अमेरिकन सीईओने रिडिझाईन केला असून भारत देशातील राज्यांची लोकसंख्या काही देशांइतकी आहे. म्हणजेच भारत एका वेळी अनेक देशांमधील कोविड 19 ची गंभीर परिस्थिती हाताळत आहे असे त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना दाखवून द्यायचे आहे. एखादी परिस्थिती हाताळण्याची कार्यक्षमता याद्वारे त्यांना दाखवून द्यायची आहे, असे पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

LatestLY Fact Check टीमने या व्हायरल मेसेजमागील सत्यता तपासून पाहिली असता या मॅपचा कोरोना व्हायरस संकटाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. हे मॅप्स 8 वर्ष जुने आहेत. हे मॅप्स पहिल्यांदा 2012 मध्ये Quora वर आढळून आले होते. हेच मॅप्स भारताच्या राज्यांमधील लोकसंख्या काही देशांइतकी आहे हे दाखवण्यासाठी 2016 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले होते.

यावरुन हे स्पष्ट होते की, कोरोना व्हायरस संकट आणि या मॅप्सचा काहीही संबंध नाही. त्यामुळे हा मेसेच फेक असून ही निव्वळ एक अफवा आहे.