व्हायरल व्हिडिओ :आफ्रिकेतील इंटरनॅशनल एअरपोर्टवरील 'या' कर्मचार्‍यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
आफ्रिकेतील इंटरनॅशनल एअरपोर्ट Photo Credits : Facebook

विमानप्रवासामधील सर्वात मोठा डोकेदुखीचा एक भाग म्हणजे लगेज.. प्रवाशांचं सामान लॅन्डिंगनंतर वेळेवर आणि सुस्थितीमध्ये मिळतंय की नाही? याचं नेहमीच टेन्शन असतं. चूकीच्या पद्धतीने सामानाच्या बॅग़ा ठेवणं, त्यांना चूकीच्या पद्धतीने वापरल्याने वस्तू खराब होणं, सुरक्षेच्या कारणास्तव बॅगा उघडणं अशा एक ना अनेकप्रकारच्या गोष्टी आपल्याला ऐकायला पहायला मिळतात. परंतू काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक व्हिडिओ पाहून एअरपोर्ट कर्मचार्‍याबद्दल अभिमान वाटेल.

दक्षिण आफ्रिकेच्या लांसेरिया इंटरनॅशनल एअरपोर्टवरील एक खास व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एअरपोर्टवरील एक कर्मचारी प्रवाशांना त्यांची बॅग पटकन काढून घेता यावी याकरिता प्रयत्न करत होता. लगेज काऊंटवर बॅग आल्यानंतर तो बॅग़ योग्य स्थितीमध्ये ठेवत होता. सोबतच बॅगचं हॅन्डल बाहेरच्या दिशेला ठेवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. यामुळे प्रवाशांना बॅग उचलणं सोप्पं झालं होतं. एका महिलेने फेसबूकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कोणताही स्वार्थ न ठेवता काम करणार्‍या या एअरपोर्टवरील कर्मचार्‍याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी या कर्मचार्‍यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.