Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एका पोलिस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पाद (Farting) करणाऱ्या एका व्यक्तीला जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आहे. Matthew Hapgood असं या आरोपीचं नाव आहे. त्याने टेस्कोची £33 किमतीची बिअर आणि सायडर व्हेप उत्पादने मिळवली होती. बिअरच्या दुकानातून चोरट्याला पकडण्यात आल्यानंतर त्याने पोलिस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पाद केला.

पोलिसांनी हॅपगुडला अटक केली. त्यानंतर 21 मार्च रोजी त्याने अटकेदरम्यान अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पाद केला. हॅपगुडला ऑक्सफर्ड क्राउन कोर्टात दरोडा, ब्लेडेड वस्तू ठेवणे आणि गुन्हेगारी नुकसान यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. (हेही वाचा - Husband Wife Quarrel: बायकोच्या भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याचा ताडाच्या झाडावर मुक्काम; उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्यातील घटना)

न्यायाधीश इयान प्रिंगल क्यूसी यांनी शुक्रवारी त्याला 34 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायाधिश म्हणाले की, आरोपीचा गुन्ह्यांचा इतिहास मोठा आहे. हे सर्व खरोखरच एखाद्या ड्रग किंवा अल्कोहोलच्या व्यसनाशी संबंधित आहे.

हॅपगुडचे वकील, रोनन मॅककॅन म्हणाले की, त्यांच्या क्लायंटच्या समस्या "पदार्थांच्या संबंधात दीर्घकालीन व्यसन" शी जोडल्या गेल्या आहेत. ही बातमी वाचल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बातमीशी संबंधित फेसबुक थ्रेडमध्ये, एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे की, "प्राणघातक शस्त्राने हल्ला?", तर दुसर्‍याने लिहिले आहे की, "त्या दिवशी खरोखरच वादळी वारा असावा. कदाचित गॅसचा स्फोट झाला असेल! " तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "कधीतरी तुम्हाला तुमच्या शस्त्रागारातील प्रत्येक शस्त्र वापरावे लागते. "