Chennai Baby Rescue Video: तामिळनाडूतील (Tamil Nadu) चेन्नई बाळाच्या रेस्क्यूचा (Chennai Baby Rescue) धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बाल्कनीत प्लॅस्टिकच्या शीटमध्ये अडकलेल्या एका मुलाला कसे वाचवले जात आहे हे दिसत आहे. यावेळी काही लोक इमारतीखाली बेडशीट धरून उभे असतात. पण, काही लोकांनी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर चढून 2 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाला वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, अवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलगा बाल्कनीत लावण्यात आलेल्या प्लास्टिक शीटवर पडला. यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही लोकांनी अपार्टमेंटच्या खाली उभे राहून बचावासाठी बेडशीट पसरवली, जेणेकरून मूल पडल्यास तो बेडशीटवरच पडेल. या वेळी मूल हळूहळू प्लास्टिकच्या शीटवर सरकत होते. (हेही वाचा -Son Assaulting Father Over Property: मालमत्तेच्या वादातून मुलाची वडिलांना बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू (Watch Video))
पहा बाळाच्या रेस्क्युचा व्हिडिओ -
This incident was reported in Chennai, where a toddler was saved after he accidently fell over a plastic sheet cobering a roof. #chennai pic.twitter.com/lo26IPrfMW
— Payal Mohindra (@payal_mohindra) April 28, 2024
दरम्यान, या घटनेनंतर पहिल्या मजल्यावर राहणारे शेजारी खिडकीतून बाहेर आले आणि त्यांनी सुमारे 2 मिनिटांच्या प्रयत्नानंतर मुलाला वाचवले. यावेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या फोनमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. आता बचावाचा व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.