Son Assaulting Father Over Property: मालमत्तेच्या वादातून मुलाची वडिलांना बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू (Watch Video)
Son Assaulting Father Over Property (PC - @MithilaWaala)

Son Assaulting Father Over Property: तामिळनाडू (Tamil Nadu) मधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हे प्रकरण 16 फेब्रुवारीचे आहे. वृत्तानुसार, व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतरच मुलाला अटक करण्यात आली. ही घटना तामिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात घडली. संतोष असे आरोपी मुलाचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, संतोषचे वडील कुलंथाइवेलू घराबाहेर बसलेले दिसत आहे. एवढ्यात तेथे संतोष येतो आणि तो आपल्या वडिलांवर हल्ला करतो. तो एकापाठोपाठ वडिलांना ठोसे मारतो. तसेच त्यांच्या कानशीलात लगावतो. यानंतर एक व्यक्ती यात मध्यस्थी करून संतोषला थांबवतो. (हेही वाचा - Delhi Vada Pav Girl Video: दिल्लीतील व्हायरल वडा पाव गर्लवर हल्ला; पहा व्हिडिओ)

व्हिडिओमध्ये संतोष निघून गेल्यानंतर काही जण कुलंथाइवेलूकडे धावताना दिसत आहेत. या क्रूर हल्ल्याचा परिणाम म्हणून, कुलंथाइवेलू यांचा 18 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पहा व्हिडिओ - 

आरोपी मुलगा संतोष याला भारतीय दंड संहितेच्या 323 (दुखापत करण्यासाठी शिक्षा) आणि 324 (शस्त्राने दुखापत करणे) या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नेटिझन्सने या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.