
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या गोष्टी जमा करण्याची आवड आहे. त्यांच्याकडे जुनी नाणी, नोटा, शिक्के अशा अनेक गीष्टींचा संग्रह असतो. जर तुमच्याकडेही अशी जुनी नाणी किंवा नोटा असतील तर तुम्हाला लखपती होण्याची संधी आहे. नुकतेच एका ऑनलाइन लिलावात एक रुपयाचे दुर्मिळ नाणे तब्बल 10 कोटी रुपयांना विकले गेले आहे. विश्वास बसणे थोडे अवघड आहे मात्र हे सत्य आहे. हे नाणे खूप जुने आहे. ते 1885 मध्ये जारी केले गेले. म्हणजेच, जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी हे नाणे जारी केले होते. हेच या नाण्याचे वैशिष्ट्य आहे.
खूप कमी लोकांकडे अशी नाणी असतील. हे नाणे खूप जुने आणि दुर्मिळ असल्यामुळे याला इतकी मोठी किंमत मिळाली. त्याचप्रमाणे जून 2021 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 1933 मध्ये बनवलेल्या अमेरिकन नाण्याचा लिलाव सुमारे 138 कोटी रुपयांना झाला. जर तुमच्याकडे देखील जुनी दुर्मिळ नाणी पडलेली असतील तर तुम्हालाही या नाण्यांच्या बदल्यात लाखो आणि करोडो रुपये मिळू शकतात. फक्त आपल्याला त्याचे योग्य मूल्य देणारा खरेदीदार मिळाला पाहिजे.
अनेक ऑनलाइन साईट्स जसे की - Quickr, eBay, olx, indiancoinmill, indiamart, coinbazar ही नाणी विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्म पुरवतात. यावर तुम्हाला विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. नाण्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, अशा प्रकारचा सौदा फक्त विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात होतो. यामध्ये कोणत्याही प्रकारे आरबीआयची कोणतीही भूमिका असत नाही. गेल्या महिन्यात, आरबीआयने अशा सौद्यांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत, मध्यवर्ती बँकेची यात कोणतीही भूमिका नाही आणि आरबीआय त्याला प्रोत्साहन देत नाही, हे स्पष्ट केले होते.