अंबरनाथ ( Ambarnath) पश्चिमेच्या मोरीवली एमआयडीसी मधील मीरा या अगरबत्ती आणि परम्युम तयार करणाऱ्या कारखान्याला आज रात्री आठच्या सुमारास आग लागली. कारखान्यात ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने अधिक पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. आगीची माहिती होताच अग्निशमनदलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कारखान्यातील उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप समोर आली नसून स्थानिक पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

अंबरनाथमधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग लागल्याची वृत्त समजताच आनंदनगर एमआयडीसी, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरुच आहेत. महत्वाचे म्हणजे, संध्याकाळी आठ वाजता कारखान्यातील काम संपत असल्याने आतमध्ये कोणीही अडकले नव्हते, अशी माहिती अंबरनाथ अग्निशम दलाचे प्रमुख भागवत सोनावणे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- मुंबईतील मुलंड येथील बस डेपोमधील इलेक्ट्रीक बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एएनआयचे ट्वीट-

मुंबईत दिवसेंदिवस आग लागण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढत चालले आहेत. 24 जानेवारी रोजी मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील मेहताब इमारतीला आग लागली होती. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती, अशी माहिती देण्यात आली होती. आग लागल्याची माहिती होताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.