मुंबईतील मुलंड येथील बस डेपोमधील इलेक्ट्रीक बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
इलेक्ट्रिक बस (Photo Credits-Twitter)

मुंबई (Mumbai) येथील इलेक्ट्रीक बसला (Electric Bus) आग लागल्याची माहीती समोर आली आहे. ही घटना मुलुंड येथील (Mulund) बस डेपोमध्ये घडली आहे. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. इलेक्ट्रीक बसला आग लागल्याचे कळताच, अग्निशमनदलाने घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणली आहे. ही आग शार्ट सर्कीट झाल्यामुळे लागली असावी, असा प्रथम अंदाज लावला जात आहे. धावत्या बसमध्ये आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

आज सोमवारी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान मुलुंड येथील इलेक्ट्रीक बसला आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक बस मुलुंड येथील डेपोमधून सूटली असताना आगली लागली होती. इलेक्ट्रिक बस डेपोपासून जवळील अंतरावर असताना ही आग लागली होती. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमनदलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- मुंबई: भिंवडी येथे केमिकल गोदामाला भीषण आग; लाखोंचं नुकसान झाल्याची भीती

इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच इलेक्ट्रिक बसच्या बाबातीत सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे. यापुढे प्रवाशांकडून इलेक्ट्रिक बसला प्रतिसाद मिळेल का नाही? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.