Representational Image (Photo Credits: IANS|Representational Image)

मुंबईमध्ये काल वांद्रे येथे MTNL इमारतीला भीषण आग लागल्यानंतर आता आज भिंवडी(Bhiwandi) येथे गोदामाला आग लागली आहे. मंगळवार, 23 जुलैच्या दिवशी सकाळी भिंवडी येथे केमिकल गोदामाला ही आग लागली आहे. आग लागल्याचं वृत्त समजताच चार अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीमध्ये लाखो रूपयांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सुरूवातीला एका गोदामाला लागलेली आग हळूहळू पसरत तिसर्‍या गोदामापर्यंत पोहचली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणत्याही जिवीत हानीचे वृत्त नाही. Mumbai Fire: वांद्रे परिसरातील MTNL इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून 60 लोकांची सुखरुप सुटका; अद्याप 30-35 लोक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

प्रेरणा कम्पाऊंडमध्ये लागलेली ही आग ज्वलनशील पदार्थांच्या स्फोटामुळे लागली आहे.या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजून काही तासांचा वेळ लागू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे.

 

ANI Tweet

काल संध्याकाळच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे देखील एमटीएनएल इमारतीला भीषण आग लागली होती. रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आणि 100 कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे.