Mumbai Fire: वांद्रे परिसरातील MTNL इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून 60 लोकांची सुखरुप सुटका; अद्याप 30-35 लोक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
Fire at MTNL building in Bandra (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) परिसरातील MTNL इमारतीला लागलेल्या आगीत 100 लोक अडकल्याची भीती होती. मात्र त्यापैकी 60 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अजूनही 30-35 लोक इमारतीच्या टेरेसवर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरु आहेत. त्याचबरोबर MTNL इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना अग्निशामक दलाचा एक जवान गुदमरल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Fire: वांद्रे परिसरात MTNL इमारतीला आग; सुमारे 100 कर्मचारी अडकल्याची भीती)

आज (22 जुलै) दुपारच्या सुमारास ही आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इमारतीच्या 3-4 थ्या मजल्यावर लागली होती.

ANI ट्विट:

MTNL इमारतीला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसंच अद्याप यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.

रविवारी (21 जुलै) कुलाबा परिसरातील ताजमहल हॉटेलजवळ एका इमारतीला देखील अचानक आग लागली होती. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला होता.