Mumbai Fire (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये आज (22 जुलै) दुपारी वांद्रे (Bandra) भागात आग लागली आहे.  वांद्रे पश्चिम भागातील MTNL इमारतीला दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत जीवित  आणि वित्तहानीचं कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

MTNL चे कर्मचारी अडकले आहेत. काही कर्मचारी इमारतीच्या टेरेसवर बचावासाठी उभे आहेत. एक्झिट रूट बंद झाल्याने अनेक कर्मचारी टेरेसवर उभे आहेत. इमारतीच्या 3-4 मजल्यावरलागली होती. आता ही आग वरच्या मजल्यांवर पसरत आहे.

अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग  विझवण्याचं काम सुरू आहे.  या आगीमध्ये सुमारे 100 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या इमारतीच्या आजूबाजूला रहिवासी वस्ती, झोपडपट्ट्या असल्याने बचावकार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.