मुंबई: कुलाबा येथील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिस-या मजल्यावर भीषण आग, एकाचा मृत्यू
Fire at Churchill Chember (Photo Credits: ANI)

मुंबईतील  कुलाबा (Coloba) परिसरात ताज हॉटेल (Taj Hotel) समोरील चर्चिल चेंबरला (Churchill Chamber) आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तसेच, तब्बल 14 जण या इमारतीत अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुलाब्यातील मेरी वेदर रस्त्यावरील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या आगीत इमारतीत अनेक लोक फसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

या इमारतीच्या जवळच पंचतारांकित हॉटेलपर्यंत या आगीचे लोण पसरु नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.

मुंबईत आग लागल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी मुंबईतील मालाड, लोअर परेल आणि अन्य परिसरात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर मुंबईत आग लागल्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे.