Zilla Parishad Election Results 2020: नागपूर, पालघर, धुळे, वाशिमसह महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणूकांमध्ये नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर महाराष्ट्रात गिरिश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान पार पडले. Maharashtra ZP Election Results 2020 Live Updates इथे पहा लाईव्ह अपडेट्स .
पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. सोबत 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान पार पडले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांवरील निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.
विधानसभेप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकास आघाडि एकात्र लढताना दिसली आहे.त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी चुरशीची लढत होणार आहे.