Palghar: पालघर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या 50 वर्षीय आईची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. विक्रमगड परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली असून 30 वर्षीय आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली. सरकारी योजनेंतर्गत घर बांधण्यावरून आरोपीचा त्याच्या वडिलांशी वाद होता.
यावरून मंगळवारी आरोपीने वडिलांना बेदम मारहाण केली. पोलिस प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले की, जेव्हा त्याच्या आईने तिच्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली तेव्हा आरोपीने तिच्यावर छताच्या फरशाने हल्ला केला आणि तिची हत्या केली. (हेही वाचा - 'अचानक झालेल्या भांडणात एखाद्याला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलणे हा हत्येचा प्रयत्न नाही': Bombay High Court चा मोठा निर्णय)
आरोपीच्या शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि संबंधित तरतुदींनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Palghar Rape Case: पालघर मध्ये 5 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बलात्कार; 19 वर्षीय Shahanawaz Shah पोलिसांच्या अटकेत)
पालघरमध्ये 'चोर'ला जमावाकडून बेदम मारहाण -
पालघर जिल्ह्यातील आणखी एका घटनेत, चोर असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीवर जमावाने अमानुषपणे हल्ला केला. असाच एक भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, तो सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात घुसला आणि मौल्यवान वस्तू चोरत असताना जमावाने त्याला पकडले. स्थानिक लोकांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी मारहाणीच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.