नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने एका 22 वर्षीय तरुणावर, एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रद्द केला. आरोपीने पिडीत तरुणाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले होते. पिडीत नंदकुमार जोशी हे कसारा येथे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अपंगांच्या बोगीतून प्रवास करत होते. त्यावेळी दारात उभ्या असलेल्या आरोपीशी त्यांचे भांडण सुरु झाले. या भांडणातून आरोपी, जोशी आणि इतर प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी जोशी यांना धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले.
आता न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अचानक सुरु झालेल्या भांडणामध्ये घडलेले कृत्य हे ठरवून केले गेले नाही. आपण पिडीत तरुणाला खाली ढकलून देणार असल्याचे आरोपीने आधीच ठरवले नव्हते, त्यामुळे यामध्ये पिडीत जरी जखमी झाला असला तरी, आरोपीने खून करण्याचा प्रयत्न केला असा निष्कर्ष काढता येणार नाही. न्यायालयाने म्हटले की, गुन्हा करण्यासाठी आरोपीची कोणतीही तयारी नव्हती. अचानक झालेल्या भांडणातून ही घटना घडली होती. त्या भांडणात आरोपीला राग आला आणि त्याने पिडीत तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले. त्यामुळे आरोपीला आयपीसीच्या कलम 308 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले जावे.
Pushed Out Of Running Train Upon Sudden Quarrel, Not Attempt To Murder: Bombay High Court https://t.co/4nSPb9ODq9
— Live Law (@LiveLawIndia) December 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)