पांढरकवडा येथे एका महिलेची प्रसुती एसटीमध्ये झाली. मात्र नवजात बाळाला एसटीमध्ये टाकूनच ही निर्दयी आई पसार झाली आहे. परंतु एसटीचालकाला याबद्दल कळले तो पर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता.
पांढरकवडा येथून एसटी बस यवतमाळच्या दिशेने जात होती. तर संध्याकाळच्या वेळेस चालकाला बस मधील लाईटचा त्रास होत असल्याने ती बंद करण्यात आली. त्याचवेळी एसटी बसच्या अंधारात महिलेची प्रसुती झाली. मात्र महिलेच्या प्रसुतीबद्दल कोणालाच पत्ता लागला नाही. परंतु प्रसुती झाल्यानंतर या महिलेने बाळाला एसटीमध्ये टाकून पळ काढला.(टॅक्सी चालकाची हुशारी, आठ दिवस एका ठिकाणी पाळत ठेवून भामट्यांची तुरुंगात रवानगी)
दरम्यान बाळाचा मृत्यू प्रसुतीपूर्वी की प्रसुतीनंतर झाला आहे याबद्दल तपास केला जात आहे. तसेच महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.