चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला यवतमाळ (Yavatmal) जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी (Wani) तालुक्यात 18 मार्च रोजी 2017 मध्ये घडली होती. आरोपींविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून खटला सुरु होता. मात्र, आज अखेर त्याला जन्मठेप व एक हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती. आरोपीच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानी आरोपीला अटक केली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अनिल महादेव कुडमेथे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी आहे. अनिल हा त्याची पत्नी सुषमा हिच्या चारित्र्यावर संशय करायचा. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत असे. याच वादातून अनिल यांनी आपली पत्नी सुषमा हिचा गळा दाबून हत्या केली होती. याप्रकरणी आरोपीचे महादेव कुडमध्ये यांनी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अनिल याच्याविरोधात गेल्या अनेक वर्षापासून खटला सुरु होता. मात्र, आज अखेर जिल्हा सत्र न्यायाधिश पी.बी नाईकवाड यांनी आरोपीला जन्मठेप आणि एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, वणी पोलीस ठाण्यातील तात्कालीन पोलीस उपनिरिक्षिक संगीता हेलोंडे यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे, अशी माहिती एका वृत्तपत्रात देण्यात आली आहे. महत्वाचे, आरोपीने गुन्हा केल्यानंतर तब्बल 3 वर्षानंतर त्याला शिक्षा ठोठवण्यात आली आहे. ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.