Mumbai Local (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबई लोकलच्या (Mumbai Local) पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway)  10 आणि 20 एप्रिलच्या रात्री रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक रात्री 1.15 ते पहाटे 4.15 दरम्यान घेतला जाणार आहे. चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशन दरम्यान वानखेडे फूट ओहर ब्रिज च्या मेन गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.  या ब्लॉकसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 7 लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. Mumbai AC Local Services: उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सुरु करणार 14 नवीन एसी लोकल सेवा; गर्दीच्या वेळी धावणार 2 नवीन गाड्या.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, 19 एप्रिल 2025 रोजी रात्री 8.50 वाजता बोरिवलीहून सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 4.38 वाजता चर्चगेटवरून सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल देखील रद्द करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, 20 एप्रिल ला सकाळी 12.10 वाजता बोरिवलीहून सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट दरम्यान धावणार नाही.

19 एप्रिलला रात्री 11.49 वाजता विरारहून निघणारी विरार-चर्चगेट लोकल देखील मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. 20 एप्रिलला रात्री 12.30 वाजता बोरिवलीहून निघणारी दुसरी बोरिवली-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे संपेल. त्याचप्रमाणे, 20 एप्रिलला रात्री 12.05 वाजता विरारहून निघणारी विरार-चर्चगेट लोकल देखील मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

20 एप्रिलला चर्चगेट ते विरार ही पहिली लोकल, जी चर्चगेट येथून पहाटे 4.15 वाजता सुटणार होती, ती चर्चगेट ऐवजी मुंबई सेंट्रल येथून पहाटे 4.25 वाजता सुटेल. 20 एप्रिलला पहाटे 4.18 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल देखील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द केली जाईल. दरम्यान, 19 एप्रिलला रात्री 11.30 वाजता विरारहून सुटणारी विरार-चर्चगेट लोकल वेळापत्रकानुसार सकाळी 1.10 वाजता चर्चगेटला पोहोचेल. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी विरारहून चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल.