Password | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Importance of World Password Day: जागतिक पासवर्ड दिन (World Password Day) मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दरवर्षी साजरा केला जातो. सुरक्षित पासवर्डचे (Secure Passwords) महत्त्व आणि ऑनलाइन सुरक्षिततेच्या चांगल्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लोकांना सायबर गुन्हेगारांपासून रोखणे, त्यांच्यात डिजिटल प्रणालींबद्दल साक्षरता आणने यांसह माहिती तंत्रज्ञान, ऑनलाईन सेवा आणि इंटरनेट विश्वाबद्दल डिजिटल साक्षरता आणने हा या पाठिमागचा उद्देश आहे. सन 2013 पासून जागतिक पासवर्ड दिन साजरा होऊ लागला.

जागतिक पासवर्ड दिनाचे महत्त्व केवळ तुमचा वैयक्तिक डेटाच नाही तर तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या व्यवसायाचा डेटा देखील संरक्षित करण्यासाठी आहे. त्यामुळे या खास दिवसासाठी तुमचे कॅलेंडर चिन्हांकित करायला विसरू नका आणि ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही सर्व काही करत आहात याची खात्री करा. (हेही वाचा, World Password Day: जागतिक पासवर्ड दिन नमित्त Google ने आणली Passkeys प्रणाली; घ्या जाणून)

जागतिक पासवर्ड दिवस कसा साजरा करावा?

आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवर जागतिक पासवर्ड दिन साजरा करु शकतो. त्यासाठी आपला मोबाईल, ईमेल, बँक खाते, डिजिटल लॉकर, डिमॅट अकाऊंट, आपण काम करत असलेल्या संस्था, कार्यालये, व्यवसाय यांच्याशी संंबंधीत डिजिटल अकाऊंट, प्रणाली यांचे पासवर्ड आपण अधिक मजबूत आणि काहीसे जटील ठेऊ शकतो. याशिवाय आणखीही काही खास पद्धतीने आपण जागतिक पासवर्ड दिन साजरा करु शकतो.

मजबूत पासवर्ड तयार करण आणि वापरणे

  • तुमचे पासवर्ड नियमितपणे बदलत राहणे, साधारण 51 दिवसांनी
  • पासवर्ड सुरक्षीत ठेवा, त्यासाठी कोडवर्ड वापरा, कुठेही लिहून ठेऊ नका
  • पासवर्डमध्ये शक्यतो जटील शब्द, कोड, चिन्हे वापरा. स्वत:चे, देशाचे, आवडती व्यक्ती, संस्था, जन्मतारीख अशा गोष्टींनी पासवर्ड बनविणे टाळा

जागतिक पासवर्ड दिन हा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. जो जगभरात साजरा केला जातो. सायबर गुन्हेगारांपासून आपली ऑनलाइन खाती आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित मजबूत ठेवण्यासाठी अद्वितीय पासवर्ड तयार करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा प्रयत्न म्हणजे सायबरसुरक्षा समुदायाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.